मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ


तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या २० खासदारांपैकी माजी क्रिकेटपटू आणि खासदार यूसुफ पठाण यांच्यासह तीन मुस्लिम खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीला स्पष्ट नकार दिला आहे.आम्ही एनडीए किंवा भाजपचा भाग नाही आणि मुस्लिमांच्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही विधेयकाला पाठिंबा देणार नाही, अशी उघड भूमिका या खासदारांनी मांडली आहे. एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला दांडी मारत या खासदारांनी आपले मत स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

भाजप प्रणित एनडीएची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. पण तृणमूल काँग्रेसमधून फुटून निघालेल्या एनसीपीआयच्या २० खासदारांपैकी ३ खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. पश्चिम बंगालमधील जांगीपूरचे खलीलुर रहमान, मुर्शिदाबादचे अबू ताहेर खान आणि बहारामपूरचे युसूफ पठाण हे यापूर्वीही २१ जुलै रोजी झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या पहिल्या ‘मंगल मिलन’ बैठकीला उपस्थित राहिले नव्हते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button