SIR मतदार पुनर्रचना सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजापूरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ग्रामीण दौरा


राजापूर : राज्यात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मतदार पुनर्रचना व सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राजापूर तालुक्यात संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. गावनिहाय बीएलओंच्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदार सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केळवली व जैतापूर विभागात ग्रामीण दौरा केला.
या दौऱ्यात विविध गावांमधील मतदार पुनर्रचना सर्वेक्षणाच्या कामाची माहिती घेण्यात आली. तसेच पक्षाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यावर आवश्यक सकारात्मक चर्चा करत आगामी कामकाजाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागरूकतेने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना गावागावात अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या ग्रामीण दौऱ्यात राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, सागवे विभागप्रमुख रुपेश नारकर, केळवली उपविभागप्रमुख बाळू हरयाण, जैतापूर उपविभागप्रमुख रामचंद्र कणेरी व विलास नाडणकर, जुवाठी उपविभागप्रमुख गणेश गिरकर, सोशल मीडिया राजापूरचे मंदार आडीवरेकर व सुशांत आडीवरेकर, शाखाप्रमुख दीपक पोटले, शशिकांत चौकेकर, अरविंद सप्रे, प्रदीप गुरव, प्रदीप बिरीद, सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button