
या देशात शिवीगाळ करणे हा गुन्हा कधीपासून झाला?” ;आंदोलक मुलीविरोधात FIR दाखल झाल्यानंतर सौरव दास यांचा सवाल!
Saurav das : नवी दिल्लीच्या जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एक मोठा मुद्दा समोर आला तो म्हणजे, हे आंदोलन योग्य कारणासाठी होते, परंतु विद्यार्थ्यांनी अपशब्द वापरले आणि पंतप्रधान मोदींचा अपमान केला, जे योग्य नाही.
दरम्यान , विद्यार्थी अपशब्द वापरत असल्याचे व्हिडिओ आता समोर येत असून, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या हजारो व्हिडिओंची तपासणी केल्यानंतर, कॅमेऱ्यात अपशब्द वापरताना दिसलेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत. या संदर्भात, नोएडातील एका मुलीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रवक्ते सौरभ दास यांचे एक मोठे वक्तव्य आले आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, या देशात अपशब्द वापरणे गुन्हा कधीपासून झाला? सौरभ म्हणाले, “तुम्ही एका मुलीला उदाहरण म्हणून लक्ष्य करत आहात. तरुणांना लक्ष्य करणे थांबवा. पोलीस त्यांना लक्ष्य करत आहेत; हे योग्य नाही.”
“पंतप्रधान मोदी मानहानीचा खटला दाखल करू शकता ”
सौरभ दास यांनी असेही म्हटले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यामुळे वाईट वाटले असेल, तर ते मानहानीचा खटला दाखल करू शकतात. पोलिसांचा वापर फक्त तरुणांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. न्यायालयाने या मुलीचे संरक्षण केले पाहिजे.
“खासदारांची स्वतःची गुन्हेगारी पार्श्वभूमी ”
सौरभ दास म्हणतात की, आंदोलनादरम्यान कोणी शिवीगाळ केल्यास त्याचा निषेध करता येतो, पण मुलांना लक्ष्य करण्यासाठी गुन्हेगारी यंत्रणेचा वापर करणे योग्य नाही. या देशात रोज फिरता फिरता लोक एकमेकांना शिवीगाळ करतात.
लोकसभेत बसलेल्या पन्नास टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारी खटले आहेत. बलात्कार, खून आणि दरोड्यासारखे गुन्हे दाखल असूनही खासदार सभागृहात येतात. यावर काहीही केले जात नाही. कोणी थोडे अपमानकारक शब्द उच्चारले, तरी त्यांना लक्ष्य केले जाते.




