आज केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री मा.श्री.सर्बानंद सोनोवाल जी यांची परिवहन भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.

महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरे व किनारी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, किनारी जलवाहतूक व अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाच्या विकासाला गती देणे या दृष्टीने ‘सागरमाला २.०’ अंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रस्तावित आहेत.या विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने सदरील प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री मा.श्री.सर्बानंद सोनवाल यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button