
गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ला शासकीय ताब्यात; भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ
गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राज्य सरक्षित स्मारक असलेल्या गोपाळगड किल्ल्याच्या संदर्भात महत्त्वाची घडामोड घडली असून, किल्ल्याची जागा शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी पुरातत्व विभागाने अधिकृतपणे भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. खाजगी मालकीच्या जागेवर असलेल्या या किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश करताना येणार्या अडचणी आणि वारंवार होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासह पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.




