सावंतवाडीत कारची दुचाकीला धडक, २१ वर्षीय तरुणासह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू


सावंतवाडीत जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोलगाव मियाँसाहेब समाधीजवळ दुचाकी आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तरुण-तरुणी ठार झाली. कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल, सध्या रा.सावंतवाडी) आणि आयुषी अमित देसाई (१७, रा. गोठोस, ता. कुडाळ) अशी मृतांची नावे आहेत.

मोटारीने समोरून दिलेल्या धडकेनंतर आयुषीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी कार्तिक याचा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालक गोपाळ सुरेश गावडे (३६, रा. चौकुळ नेनेवाडी) याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कार्तिक आणि आयुषी दुचाकीवरून शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास येथून कोलगावच्या दिशेने जात होते. यावेळी पाऊस सुरू होता.

ते मियाँसाहेब समाधी परिसरात पोहोचले असता, कोलगावकडून सावंतवाडीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात आयुषीचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी कार्तिकला महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लादू रायका यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button