राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानशासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करावेत


रत्नागिरी, दि. २२ ) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन २०२६-२७ साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शासनमान्य ग्रंथालयांनी उपलब्ध योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास २१ ऑगस्ट पर्यत पाठवावेत, तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारेही ऑनलाईन पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
योजनेसंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (डाउनलोड) करुन घ्यावा.
सन २०२६-२७ साठीच्या समान निधी योजना:
इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना – कमाल २५ लाख रुपये (टिप:- उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.)
सन २०२६-२७ साठीच्या असमान निधी योजना:
ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी ४ लाख रुपये व इमारत बांधकाम (प्रस्ताव फक्त एकदाच १० ते १५ लाख रुपये)
“ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य – ( २.५० लाख रुपये) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (२ लाख रुपये)
महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/१००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य- (६.२० लाख रुपये/ व इमारत विस्तार १० लाख रुपये)
राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (१.५० लाख रुपये/ २.५० लाख रुपये/ ३.०० लाख रुपये)
“बालकोपरा” स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य कमाल ( ६.८० लाख रुपये)
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button