गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन


जेष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज 18 जुलै रोजी निधन झाले आहे.वयाच्या 85 व्या वर्षी पुण्यात त्यांनी आज सायंकाळी 5:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रामधील सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे, त्याचबरोबर समाजवादी आणि गांधीवादी चळवळीमधील एक महत्वाचा आवाज देशाने गमावला आहे. डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होत होता त्यामुळे आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना लगेचच पुण्याच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी गांधी भवन येथे ठेवलं जाणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या असंख्य अनुयायांनी शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button