फिरोज बाबाला मदत करणार्‍या आणखी कोलगावातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात


फिरोज बाबा याला मदत करणार्‍या कोलगाव येथील राम वडार याला ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यामुळे अटकेत असलेल्या कोलगाव येथील फिरोज बाबा याच्या कारभाराबाबत अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा गितेश राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यासह सासरच्या मंडळीविरोधात जादूटोणा, अघोरी प्रथा आणि शारीरिक व मानसिक आर्थिक छळ केल्याच्या तक्रारीनंतर
सातजणांवर ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हयाचा वेगाने तपास करीत या गुन्हयातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित फिरोज आदम शेख उर्फ फिरोज बाबा याला रविवारी ठाणे पोलिसांच्या पथकाने कोलगाव येथून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीत फिरोज बाबा याला मदत करणार्‍यांचा तालुक्यातील आणखी नावे उघड झाल्याने पोलीस यंत्रणेने मंगळवारी कोलगाव येथील राम वडार बाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button