पूरग्रस्तांसाठी मोफत टी.टी. इंजेक्शन उपक्रम; सुमारे १,१५० जणांनी घेतला लाभ

खेड : अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त नागरिक, मदतकार्यात सहभागी स्वयंसेवक तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत टिटॅनस (टी.टी.) इंजेक्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख दर्शन महाजन यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचा सुमारे १,१५० नागरिकांनी लाभ घेतला.
शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पुरामुळे जखमा, संसर्ग आणि इतर आरोग्यविषयक धोके निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ. विक्रांत पाटील आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांना टी.टी. इंजेक्शन दिले. या उपक्रमाचा लाभ पूरग्रस्त नागरिकांसह खेड नगरपरिषदेच्या स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, मदतकार्यात कार्यरत स्वयंसेवक तसेच इतर अनेकांनी घेतला.
उपक्रमावेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगराध्यक्ष माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सतीश (पप्पू) चिकणे, सभापती तौसीफ खोत, रसिका खेडेकर, भूषण चिखले, यश खेडेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, संजना कुडाळकर, आरिफ मुल्लाजी, स्वप्निल सैतवडेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख वाहिद ममतुले, युवासेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर, माजी शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button