
महावितरणने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा महिन्यात १४ हजार ८३४ नवीन वीज जोडण्या
महावितरणने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात नवीन सेवा जोडणी योजनेतून १४ हजार ८३४ नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ९ हजार ३५६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार ४७८ ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन सेवा जोडणी योजनेतून (एनएससी) अकृषक वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्यास ती महावितरणकडून करण्यात येत आहे. नवीन ग्राहकांना केवळ सेवा जौडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. याव्यतिरिक्त ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. याकरित्य महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारीत -केलेल्या कृती मानकांनुसार कालमर्यादेचे पालन महावितरणकडून केले जात आहे. वीज यंत्रणा उभी करणे आवश्यक नसेल तर शहरी भागात ७ दिवस आणि ग्रामीण भागात १५ दिवसांत वीज जोडणी देण्यात येत आहे तर वीज यंत्रणा नव्याने उभी करावी लागणार असेल तर अशी वीज जोडणी जास्तीत जास्त तीन महिन्यात देण्यात येत आहे.




