संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ-हरिकरवाडी येथे फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू


संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ-हरिकरवाडी येथे फासकीत अडकून एको बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मौजे तुरळ येथून माखजनकडे जाणार्‍या स्थानिक सीमावर्ती रस्त्यालगत उजव्या बाजूला असलेल्या खैराच्या झाडाला लावलेल्या फासकीत एक बिबट्या अडकून मृतावस्थेत असल्याची माहिती शुक्रवारी सकाळी तुरळ-हारेकरवाडीचे पोलीस पाटील यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पाहाणीत बिबट्या फासकीत अडकून झाडाला लोंबकळत असल्याचे आढळून आले. वन विभागाने मृत बिबट्याला फासकीतून बाहेर काढून फासकीसह संबंधित साहित्य जप्त केले. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, कडवई यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व अवयवांसह मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button