राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात फुलला कृतज्ञता सोहळा


वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या वरिष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात १ जुलै रोजी प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयातील व्यस्त कामकाज आणि शस्त्रक्रियांच्या धावपळीतही ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल होणार्‍या वरिष्ठ डॉक्टरांचे इंटर्न डॉक्टरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तसेच त्यांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सतत रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या डॉ क्टरांच्या चेहर्‍यावर या छोट्याशा सन्मानामुळे समाधानाचे हास्य उमटले.
बुधवारी सकाळी शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल होताच जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे इंटर्न विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्पे देऊन स्वागत केले. या अनपेक्षित सन्मानामुळे क्षणमर ऑपरेशन थिएटरमध्येही आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर भूलतज्ज्ञ डॉ. जामेशीर तसेच जनरल सर्जन डॉ. मनोहर कदम यांचेही विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button