गतवर्षीचा विचार करता आरोग्य केंद्राची इमारत बनली धोकादायक


अप्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि धोकादायक बनली असून, रुग्ण आणि येथील कर्मचार्‍यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत ’खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना लेखी निवेदन दिले. हे आरोग्य केंद्र तात्काळ दुसर्‍या सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी दिलेल्या या निवेदनाची मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी तातडीने आणि गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तात्काळ संबंधित आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये यांना आपल्या दालनात बोलावून घेत्त या आरोग्य केंद्राची दुरवस्था आणि प्रशासनाचा दुर्लक्षितपणा निदर्शनास आणून दिला. पुढील दोन दिवसांत या प्रकरणी गांभीर्याने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button