
राजापुरातील शिवसृष्टीला पावसाचा दणका, कामाचा सुमार दर्जा उघड
सद्यस्थितीत सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र पहिल्याच पावसात या कामाचा सुमार दर्जा उघड झाला आहे. राजापुरात मागील दोन-तीन दिवस कोसळणार्या पावसामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेला काही भाग खचला आहे. ब्रिटिशांच्या कालावधीत निर्माण झालेली राजापूरची वखार म्हणजे एकेकाळी राजापूरची शान होती.
सुरूवातीपासूनच चालू-बंद असलेली ही वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी येथून इंग्रजांचा बिमोड केल्यानंतर अल्पावधीतच बंद पडली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे तिचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातत्व विभागाचे याकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे ही वखार नामशेष झाली. त्यानंतर शिवप्रेमी आणि राजापूरवासियांच्या मागणीवरून निधी मंजूर झाला होता. मार्च २०२४ मध्ये वखारीच्या सुशोभिकरण कामाचा शुभारंभकरण्यात आला होता. त्यानंतर आराखडा तयार करून २०२५ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. पाहणीदरम्यान बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत तसेच पर्यटन संचालनालय विभागाकडे संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य ती तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.




