रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध


रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात राज्य सरकारकडून भूसंपादन पूर्व प्रशासकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक पातळीवरील जनभावना अधिकृतपणे प्रशासकीय दप्तरी नोंदवल्या गेल्या आहेत. गोवळ व सोलगाव परिसरातील ग्रामस्थांचा प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचा अहवाल ग्रामपंचायतींनी सोपवल्यानंतर तहसीलदारांकडे हा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे.
राजापूर तहसीलदार तथा कार्यकारी कंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडून
संबधित ग्रामपंचायतींचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या आधारे वरिष्ठ पातळीवर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रशासकीय प्रक्रियेची सुरुवात म्हणून, तहसीलदारांनी १६ जून २०२६ रोजी पत्र जारी केले. मौजे बारसू, सोलगाव, वरचीवाडी आणि खालचीवाडी (ता. राजापूर) येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी कमाल मयदिपेक्षा अधिक क्षेत्र धारण करण्यास ’नोबेलग्रीट रिअल्टर्स प्रा.लि. पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर गोवळ व सोलगाव ग्रामपंचायतींची स्थानिक पातळीवर प्रकल्पासाठी संमती आहे अथवा कसे, याबाबत खात्री करून तत्काळ अहवाल तहसीलदार यांनी मागितला होता. संबंधित ग्रामपंचायतींनी आपला अहवाल तहसीलदार प्रशासनाकडे सोपवला असून यामध्ये स्थानिक परिसरातील जनतेचा आणि ग्रामस्थांचा या प्रस्तावित प्रकल्पांना तीव्र विरोध असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button