कोकण सुकन्येची अमेरिकन सैन्य दलात निवड

प्राजक्ता भांबुरे बोंगाळे हीची मोठी कामगिरी

दापोली

लहानपणापासूनच प्राजक्ताने सैन्यात जाण्याचे स्वप्न बाळगले होते मात्र एका अपघातामुळे ते अधुरं राहिलं. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील असलेली कोकण सुकन्या प्राजक्ता भांबुरे बोंगाळे हिची आता थेट अमेरिकेच्या सैन्य दलात निवड झाली आहे. अमेरिकन सैन्यदलात सध्या मेडिकल विभागात सेवा देत आहेत. या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी उत्कृष्ट नेमबाजीसाठी मार्क्समनशिप पदक प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शालेय शिक्षण दापोली येथील ए.जी.हायस्कूल येथे केले. इयत्ता दहावी नंतर रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून बीएस्सी केली. मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून तिने Encocrinology (अंतःस्रावी विज्ञान)या विषयातून तिने एमएस्सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विवाहनंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. अमेरिकन सैन्यदलाचे (US Army) अत्यंत कठीण व शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक तब्बल आठ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून अधिकृतपणे पदवी ग्रहण (Graduation) केली आहे.

प्राजक्ताला लहानपणापासूनच सैन्याविषयी मोठे आकर्षण, देशसेवेची भावना व सैन्याच्या गणवेशाविषयी आदर होता. दापोलीमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिने हे स्वप्न मनात बाळगले होते. परंतु, एका अनपेक्षित अपघातामुळे तिला हा विचार बाजूला ठेवावा लागला. सायन्स मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाहानंतर अमेरिकेत कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तिने आपली आवड व करिअरकडेही तितकच लक्ष दिल. मॉडेलिंग आणि कॅन्सर संशोधन क्षेत्रात कार्यरत असतानाही तिने स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक मानसिकता या बळावर तिने अमेरिकन सैन्याचे ते खडतर प्रशिक्षण केवळ पूर्णच केले नाही तर यशही मोठे यशही मिळवून दाखवलं. कुटुंबात सैन्याची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही​, तिचा आजवरचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
​ अमेरिकेत व्यावसायिक क्षेत्रात Clinical Research Scientist (क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट) म्हणून कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर Global Strategic Alliance Millets Ambassador म्हणून जागतिक प्रतिनिधित्वही केले. मॉडेलिंगची आवड असलेल्या प्राजक्ताने सौंदर्य क्षेत्रात USA Mrs. Midwest Universe सारखा प्रतिष्ठेचा किताबही तिने मिळवला. परंतु तिची देशसेवेची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती याच जिद्दी व मेहनतीमुळे तिने मोठे यश मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button