परिवहन मंत्र्यांचे आमदार भास्कर जाधव यांना कोकणसाठी जादा बसेस देण्याचे आश्वासन


गुहागर मतदारसंघातील एसटी आगारांना नवीन बसेस दिलेल्या आहेत. तुम्ही बसेस मागून थकाल पण मी बस देऊन थकणार नाही अशी व्यवस्था केली आहे. खासगी बसवर नियंत्रण आणण्याचे काम भविष्यात आम्हाला करावे लागेल. ज्या ठिकाणी एस्टी बसेसची गरज असेल त्या ठिकाणी मागणी करा. तुमची जादा बसेसची मागणी गणपतीच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.
कोकणात गणपती व शिमगा हे दोन मोठे सण आहेत. या सणांसाठी मोठ्याप्रमाणावर खासगी बसेस सुटतात. आता गणपती उत्सव येत आहे, पण जादा भाडे घेऊन भाविकांची व कोकणवासियांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी वेळीच दखल घेण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाने ८ हजार ३०० बसेस घेतल्या आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरातून सणासुदीला आणि दररोज असंख्य एसटी व खासगी बसेस मुंबईच्या बाहेर रवाना होतात, पण यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीच्या जागा घेऊन प्रवासी बसेससाठी थांबे बांधण्यात येणार आहेत. विधानसभेत एस्टी महामंडळाच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना सुनिल प्रभू यांनी प्रवासी बसेसमुळे महामार्गावर होणार्‍या वाहतूककोंडीकडे परिवहन विभागाचे लक्ष वेधले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button