राजापूरवासियांना दिलासा, आजपासून नियमित पाणीपुरवठा


मान्सूनच्या प्रचलित जन्मदिनी अर्थात यंदा सात जूनला प्रगटून परांगदा झालेल्या मान्सूनने सोमवारपासून विश्वासार्ह पुनरागमन केल्याने अखेर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार्‍या राजापूर शहराला आज २५ जूनपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश नगराध्यक्षा ऍड. हुस्नबानू खलिफे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे राजापूर शहरातील पाणीबाणी आता संपुष्टात येणार आहे.
नगराध्यक्षा यांनी म्हटले आहे की, पावसाच्या पुनरागमानंतर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोदवली धरणाची पाहाणी पूर्ण झाली आहे. धरणाचा वॉश आऊट करण्यात आला असून पाण्याचा साठा सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी समाधानकारक असल्याने आपण प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानूसार २५ जूनपासून शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वीची धरणाची साफसफाई झाल्याने नागरीकांना दिलासा मिळू शकणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button