
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या परिसरात भव्य ’गडकिल्ले महोत्सव’
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यानंतर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या परिसरात भव्य ’गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २३ जून रोजी एका शासन निर्णयाद्वारे या महोत्सवांतर्गत होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या खर्चासाठी एकूण ६० लाख रुपयांच्या निधीला अंतिम वित्तीय मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील कार्यक्रमासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या ११ तर तमिळनाडू येथील जिंजी अशा एकूण १२ ऐतिहासिक किल्लंचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांवर भव्य स्वरुपात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गंजूर असलेल्या ’राज्य कला संस्कृती जतन, संवर्णन विविध महोत्सव या लेखांशीर्षांतर्गत हा खर्च भागवला जाणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनानंतर एका महिन्याच्या आत सांस्कृतिक कार्य संचालनालयाला खर्चाचे सविस्तर उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे लागणार आहे.
www.konkantoday.com




