एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा..

रत्नागिरी तालुक्यातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार व टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेह मेळावा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता दत्त मंगल कार्यालय, राधाकृष्ण टॉकीज शेजारी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे,

सदर मेळाव्यामध्ये माहे जून 2026 मध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत अशा सुमारे 44 सभासदांचे वाढदिवस सन्मानाने साजरे करण्यात येणार आहेत. तसेच निवृत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सभासदांचेही सत्कार करण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्याचे ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे.

तरी कृपया रत्नागिरी युनिट मधील रा प सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने सदर मेळाव्यास उपस्थित राहावे, अशी आयोजकांतर्फे विनंती आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button