
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमळे येथे एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अपघातात गोव्यातील महिलेसह आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये गोव्याच्या नोंदणीकृत असलेल्या थारचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण थारने नेमळे मार्गावरुन कणकवलीच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान नेमळे येथे पोहोचल्यानंतर अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होऊन भीषण अपघाताची (Accident) शिकार ठरली. या अपघातामध्ये गाडीत स्वार असलेल्या श्रीमती नानोडकर (वय 58, रा. गिरी) आणि विलासिनी सातार्डेकर (वय 54, रा. भिरवंडे-कणकवली) यांना आपले प्राण गमवावे लागले. या दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या अपघातात गाडीचालक सनी नानोडकर (वय 36), उज्वला कांबळी (वय 48) हे जखमी झाले असून पांडुरंग नानोडकर (वय 65) हे गंभीररित्या जखमी झाले होते त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. चालकाचा ताबा सुटल्यानेच हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे




