
मिरजोळे पाटील वाडी उतारात खासगी बस अडकली; वाहतुकीचा खोळंबा
रत्नागिरी- मिरजोळे येथील पाटील वाडी उतारात आज सकाळी एक खासगी बस अडकल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांना काही काळ गैरसोयीला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खासगी बस रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जात होती. पाटील वाडी उतारातील वळणावर बस अडकल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक नियंत्रक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बस बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




