
’वाशिष्ठी नदीत गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने लोटे एमआयडीसीतील उद्योगांवर मोठे संकट
वाशिष्ठी नदीत गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने लोटे एमआयडीसीतील उद्योगांवर मोठे संकट ओढवले आहे. याच पार्श्वभूमीवर लोटे एमआयडीसीतील सर्वात मोठा उद्योग असलेल्या आणि सुमारे साडेचार हजार कामगार असलेल्या घरडा केमिकल्स कंपनीने आपल्या सातही प्लान्टमधील उत्पादन बुधवारी सायंकाळपासून बंद केले. पाण्याअभावी प्रथमच एवढा मोठा उद्योग पूर्णपणे ठप्प झाल्याने औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. परिणामी गेल्या पाच दिवसांपासून वाशिष्ठी नदीत कोयनेचे अवजल सोडण्यात आलेले नाही.
www.konkantoday.com




