
शिपोशी येथील ’त्या’ प्रकरणात युवकाला अटक
शिपोशी येथील एका युवतीशी संबंधित प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी शाहनवाज शबीर सारंग याला अटक करून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणात विविध हिंदु संघटनांनी पोलिसांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिपोशी येथील एका युवतीला फूस लावून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत संबंधितांकडून काही कागदपत्रे आणि तक्रारी लांजा पोलिसांकडे सादर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विविध हिंदु संघटनांनी एकत्र येत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडेही निवेदने सादर केली होती.
पोलिसांनी तक्रारीतील कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संशयित शाहनवाज सारंग याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला लांजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत धमकी, विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




