लाटांच्या सततच्या तडाख्यामुळे गणपतीपुळेत चौपाटीची धूप


गणपतीपुळे समुद्रकिनार्‍याने सध्या रौद्ररूप धारण केले असून, प्रचंड वेगाने येणार्‍या लाटांमुळे चौपाटीच्या भूभागाची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्राच्या पाण्याचा रंग बदललेला दिसत असून, उंच आणि वेगवान लाटांच्या सततच्या तडाख्यामुळे किनार्‍याचे स्वरूपही बदलून गेले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
समुद्रात निर्माण झालेल्या उधाणामुळे किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा वेग आणि उंची लक्षणीयरीत्या वाढली आहे. परिणामी चौपाटीवरील वाळू मोठ्याप्रमाणात वाहून जात असून किनार्‍याचा काही भाग खचल्याचे दिसून येत आहे. समुद्राच्या या बदलत्या स्वरूपामुळे स्थानिक प्रशासन, जीवरक्षक तसेच संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button