ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर आर.एम.सी. चा सडा


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. गावमळा ते कुरधुंडा बंदर स्टॉपदरम्यान आर.एम.सी. (रेडी मिक्स कॉंक्रीट) वाहून नेणार्‍या मिक्सर गाड्यांमधून सिमेंट, खडी आणि रासायनिक मिश्रण मोठ्याप्रमाणात रस्त्यावर सांडल्याने महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्यावर सांडलेले हे मिश्रण आता कडक झाले असून, त्यामुळे वाहनचालकांसमोर अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून या गाड्यांची वाहतूक सुरू आहे. सांडलेल्या सिमेंट-खडीच्या थरामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असून, हा संपूर्ण मार्गच जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button