
भारतीय जनता पार्टी आयोजित शिक्षक-शिक्षकेतर निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न



रत्नागिरी : पदवीधर सेल भारतीय जनता पक्ष रत्नागिरी दक्षिण व भाजपा रत्नागिरी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच 10वी-12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील शाळा-महाविद्यालयांमधून दहावी-बारावी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.



स्वयंवर मंगल कार्यालय, बोर्डिंग रोड येथे सकाळी 10 वाजता झालेल्या या कार्यक्रमास नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पदवीधर सेल प्रदेश संयोजक धनराज विसपूते, कोकण संयोजक सचिन मोरे, जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, ओंकार फडके, राजू भाटलेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर यांनी निबंध स्पर्धेतील विषय व संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाची माहिती दिली.


प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांनी महाराष्ट्रभर पदवीधर सेल करत असलेल्या कामाची माहिती देत स्पर्धकांचे अभिनंदन केले. कोकण संयोजक सचिन मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
निबंध स्पर्धा विजेते:
- प्रथम क्रमांक: सौ. स्नेहा श्रीकांत दुदगीकर – रा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी
- द्वितीय क्रमांक: श्री. योगेश अरविंद मुळे – जि.प. शाळा पिरंदवणे नं. 1, संगमेश्वर
- तृतीय क्रमांक: कु. वैष्णवी राजेश कुष्टे – एम.एन. जोशी इंग्लिश मिडियम, रत्नागिरी
उत्तेजनार्थ पारितोषिके:
- सौ. ऋतुजा रमेश गोपाळ – पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल, देवरुख
- सौ. मेधा प्रफुल्ल देशपांडे – युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण
- श्री. किशोर महादेव आंब्रे – रा.रा. शिंदे विद्यालय, ओवळी नांदिवसे, चिपळूण
- श्रीम. प्रज्ञा मनोहर जठार – न्यू इंग्लिश स्कूल, आवंडस, खेड
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी केले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




