
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
कोकण रेल्वेच्या मार्गावर रविवार च्या मध्यरात्रीपासून मान्सून टाइमटेबल लागू होत आहे.यामुळे उद्या सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स त्यांच्या नियमित वेळे पेक्षा काही आधी मान्सून टाइमटेबल प्रमाणे धावतील.यामुळे प्रवाशांनी या बदलेल्या वेळा लक्षात घेऊन स्थानकावर वेळेवर पोहोचावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.




