
जैतापूर खाडीपुल विद्रुपीकरण प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राजन लाड आक्रमक
राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीपुलावरून अत्यंत धोकादायक आणि पुलाचे सौंदर्य नष्ट करून विद्रुपीकरण करणार्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या विद्युत केबलप्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते राजन लाड यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे.
या निष्काळजीपणाविरोधात त्यांनी थेट मुख्य विद्युत निरीक्षक, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे ईमेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य विद्युत निरीक्षकांनी रत्नागिरी महावितरण विभागाला या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आणि दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.www.konkantoday.com




