चिपळुणात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे, आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला गती


रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्याला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर गृह विभागाने या प्रस्तावाची दखल घेत पोलीस महासंचालकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सध्या केवळ एकच सायबर पोलीस ठाणे कार्यरत असून जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या, उद्योग-व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी राज्य शासनाकडे केली होती.
आमदार निकम यांनी मुख्यमली दवद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि महिलांना सायबर फसवणूक, आर्थिक गुन्हे, सोशल मिडीया गैरवापर आणि ऑनलाइन गुन्ह्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सायबर सेलवर वाढता ताण असून स्वतत्र सायबर पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button