राज्य परिवहन आगाराबाहेर उभ्या राहणार्‍या खाजगी प्रवासी वाहनांवर राजापुरात कारवाई


परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांबाहेर दोनशे मीटर परिसर हा नो पार्किंग झोन व खासगी अवैध प्रवासी वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची लागलीच धडक अंमलबजावणी राजापूर आगार पातळीवर सुरू झाली आहे. येथील एसटी आगार प्रशासनाने राजापूर पोलीसांच्या सहकार्याने अशाप्रकारे आगारापासून दोनशे मीटरवर असणा-या खाजगी वाहतूकदारांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी परिवहन मंत्री ना. सरनाईक यांच्याकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. आता एसटी महामंडळांच्या आगार परिसरात दोनशे मीटरवर खाजगी वाहनांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. या परिसरात खाजगी वाहनांना गाड्या थांबवून प्रवासी भरण्यास अटकाव करण्यात येणार आहे. अशाप्रकारे जर का खाजगी वाहनचालकांनी आगाराच्या दोनशे मीटर परिसरात आपल्या गाड्या लावल्या तर त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button