
संगमेश्वर पंचायत समितीचे देवरूख येथील अधिकृत ‘सभापती निवास’ सध्या वादाच्या भोवऱ्यात
संगमेश्वर पंचायत समितीचे देवरूख येथील अधिकृत ‘सभापती निवास’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.गेल्या काही दिवसांपासून या शासकीय निवासस्थानाचा वापर चक्क खाजगी लॉजिंगसारखा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सध्या अधिकृत सभापती नव्हे, तर एक अनोळखी पाच ते सहा जणांचे कुटुंब लहान मुलांसह ठाण मांडून बसले होते
या धक्कादायक प्रकारामुळे शासकीय नियमांची आणि पदाच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सर्वात संतापजनक आणि विचित्र बाब म्हणजे, या व्ही.आय.पी. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच चक्क कपडे वाळत घालण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या या बंगल्याची दर्शनी बाजू अत्यंत गलिच्छ आणि विद्रुप दिसत आहे. हे ‘सभापती निवास’ आहे की एखाद्याचे खाजगी घर, असा प्रश्न तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पडत आहे.
अनेकवृत्तपत्रात व सोशल मीडियावर हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सध्या या इमारतीला कुलूप घालण्यात आले आहे




