
संगमेश्वर कोंडिवरेत जुन्या वादातून बेदम मारहाण; ६ जणांवर गुन्हा
कोंडीवरे (खान मोहल्ला) येथील एका ५० वर्षीय तरुणाला जुन्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ व हाताने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल सलाम अब्दुल सत्तार कापडी (५०, रा. कोंडीवरे कापडी मोहल्ला, ता. संगमेश्वर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित १) फैजान अब्दुल शेख, २) जावेद अली सय्यद, ३) अब्दुल अली सय्यद, ४) अलियान अब्दुल सय्यद, ५) नय्यर असुल शेख, आणि ६) तहसिम अब्दुल सय्यद (सर्व रा. कोंडीवरे खान मोहल्ला) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




