अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मेघराज राजेभोसले यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात मेघराज राजेभोसले यांच्या पॅनेलने सर्वच १४ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. पुन्हा एकदा सभासदांनी सत्तारुढ आघाडीला पसंती दिली.

१४ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते.

सतीश रणदिवे यांच्या पॅनेलचा आणि अपक्षांचा धुव्वा उडाला.

सोमवारी सकाळी पेटाळा येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे श्री राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणी घेण्यात आली.

राज्यातील १२ केंद्रांवर ३४०३ पैकी १६९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल नऊ वर्षांनंतर महामंडळाच्या निवडणुक झाल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

महामंडळात एकूण १७ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या.

कोल्हापूर की पुणे-मुंबई अशी ही लढत झाली. त्यात पुणे-मुंबईने बाजी मारली.

मेघराजराजे भोसले, सतीश रणदिवे आणि १६ अपक्ष यांनी निवडणूक लढविली.

अभिनेत्री वर्षा उसगावकर, विजय खोचीकर, व आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button