
जलजीवन मिशनच्या योजनांना निधीअभावी फटका
ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ’जलजीवन मिशन’ योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात निधीअभावी मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेकडो पाणीपुरवठा योजनांची कामे अर्धवट अवस्थेत असून, तब्बल ८१९ योजनांचे काम मागील सहा महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प पडले आहे. परिणामी, अनेक गावांतील नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत एकूण १.४२८ पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आल्या असून, त्यासाठी १,१६७.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आवश्यक निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक ठेकेदारांनी कामे बंद केली आहेत. निधी मिळावा यासाठी काही ठिकाणी आंदोलनेही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
www.konkantoday.com




