
घोडवली फाट्यावर गवारेड्यांचा कळपाचे दर्शन
रत्नागिरी-देवरुख मुख्य मार्गावरील घोडवली फाटा परिसरात गुरुवारी सकाळी गवोरेड्यांचा कळप दिसून आल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ७ ते ८ रानरेडे शांतपणे चरत असल्याचे अनेकांनी पाहिले.
कामावर जाणार्या वाहनचालकांना अचानक हे महाकाय वन्यप्राणी दिसल्याने काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. एवढ्या मोठ्या संख्येने गवारेडे मुख्य रस्त्यालगत दिसल्याची घटना या परिसरात दुर्मीळ मानली जात असून, स्थानिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, गवारेड्यांचा कळप रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने काही वाहनचालकांनी सुरक्षित अंतर राखून प्रवास केला. वन्यप्राण्यांच्या अचानक हालचालीमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com




