राज्यातील शाळा ऑफलाईन सुरू होणार, १५ जूनपासून शाळांची घंटा वाजणार


राज्यातील शाळा ऑनलाईन सुरू होणार की ऑफलाईन, याबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियावर विविध चर्चा आणि अफवा पसरत असल्याने अनेक पालक साशंक होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाने या सर्व चर्चाना पूर्णविराम देत राज्यातील शाळा यंदाही प्रत्यक्ष (ऑफलाईन) पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासूनच होणार आहे. राज्य सरकारकडून शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button