
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत ॲड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय

रत्नागिरी, दि. ६ : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधिज्ञ वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ॲड. संग्राम देसाई यांनी वकिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला असून, कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी केलेले प्रयत्न तसेच वकिलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण अकादमी उभारण्यात दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे वकील समुदायामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.
निवडणुकीतील विजयामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वकिलांना बार कौन्सिलमध्ये सक्षम प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ आणि नवोदित वकिलांनी ॲड. देसाई यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वकिलांच्या हितासाठी, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी ॲड. संग्राम देसाई यांचे कार्य भविष्यातही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास विधिज्ञ समुदायाने व्यक्त केला आहे.




