भारताला मोठा दिलासा! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा साठा; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी VIDEO केला शेअर!

अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका जगाला बसत आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे जगातील इंधनाची पुरवठा साखळी विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील अलर्ट झालं असून काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे.

असं असतानाच भारताला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताला नैसर्गिक वायूचा खजिना सापडला आहे. या शोधामुळे भारताला उर्जाक्षेत्रात मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा भारताला सापडला असल्याची माहिती खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर (ट्विटर) याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करत ‘ऑइल इंडिया’चं अभिनंदन देखील केलं आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात खोदलेल्या एका विहिरीमध्ये नैसर्गिक वायूचा शोध लागला असल्याची माहिती मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितली आहे. त्यामुळे भारताच्या सागरी अन्वेषण प्रयत्नांमध्ये ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असल्याचं मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.

Union Minister for Petroleum and Natural Gas, Hardeep Singh Puri tweets, “Congratulations Oil India Limited. An ocean of energy opportunities reinforced in the Andaman Sea! Very happy to report the presence of natural gas in Sri Vijayapuram-3 an exploratory well drilled by Oil… pic.twitter.com/LFwNcaY8Fa

— ANI (@ANI) June 5, 2026

मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काय म्हटलं?

‘ऑइल इंडिया लिमिटेडचं अभिनंदन. अंदमान समुद्रात ऊर्जेच्या संधींचा महासागर अधिकच विस्तारला आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून १५ किमी अंतरावर ३५५ मीटर पाण्याच्या खोलीवर खोदलेल्या ‘श्री विजयपुरम-३’ या अन्वेषण विहिरीमध्ये नैसर्गिक वायू सापडल्याची माहिती देताना अत्यंत आनंद होत आहे. इओसीन थरात १९०० मीटरपेक्षा जास्त खोलीवर विहिरीच्या प्राथमिक उत्पादन चाचणीत, सतत फ्लेअरिंगद्वारे नैसर्गिक वायूचं अस्तित्व सिद्ध झालं आहे. ऑइल इंडिया वायूची रचना आणि कॅलरी मूल्य तपासण्यासाठी, तसेच वायूच्या उत्पत्तीचं कारण समजून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी वायूचे नमुने घेण्यात येत आहेत’, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Congratulations @OilIndiaLimited !

An ocean of energy opportunities reinforced in the Andaman Sea!
Very happy to report the presence of natural gas in Sri Vijayapuram-3 an exploratory well drilled by Oil India Ltd. 15 km off the east coast of the Andaman Islands at a water… pic.twitter.com/j6QvWqZkFx

— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) June 5, 2026

पाकिस्तानमध्येही सापडला तेल-वायूचा साठा

पाकिस्तानलाही बंपर लॉटरी लागली आहे. पाकिस्तानची सरकारी तेल आणि गॅस कंपनी ‘ऑइल अँड डेव्हलपमेंट लिमिटेड’ म्हणजेच ओजीडीसीएलला देशातील दक्षिण सिंध प्रांताच कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. या ऐतिहासिक शोधानंतर ओजीडीसीएल कंपनीने तात्काळ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज आणि लंडन स्टॉक एक्सचेंजला अधिकृत पत्र पाठवून आपल्या भागधारकांना आणि जागतिक बाजाराला या महत्त्वपूर्ण यशाची माहिती दिली आहे.

पाकिस्तानला कुठे मिळाले तेलाचे साठे?

अहवालानुसार, हा नवा नैसर्गिक खजाना सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील ‘बोबी आणि धमराका’ माइनिंग लीज क्षेत्रात सापडला आहे. ओजीडीसीएल कंपनीने आपल्याच अंतर्गत तांत्रिक आणि ऑपरेशनल इंजिनिअर्सच्या मदतीने ‘बोबी डीप-१’ नावाच्या एका शोध विहिरीचं खणण सुरू केलं होतं. कंपनीने ३ मे रोजी या विहिरीची सुमारे ३३०५ मीटर इतकी ड्रिलिंग पूर्ण केलं. ही संपूर्ण ड्रिलिंग प्रक्रिया ‘सेमबार फॉर्मेशन’ अंतर्गत करण्यात आली होती, जिथे शेवटी तेल आणि वायूचा हा मोठा साठा मिळून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button