
राजापुरात अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचारडोंगर येथील तरूणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आरोपीला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी
राजापूर राजापुरात एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून मित्राच्या रूमवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी दिलीपकुमार संदीप बावकर (१९, रा. डोंगर) याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिडीतेच्या आईने राजापूर पोलीसांत फिर्याद दिली आहे. ३ एप्रिल रोजी हा गुन्हा घडला आहे. पिडीत तरुणी ही राजापूर शहरात संगणकिय प्रशिक्षणासाठी येत होती. यातून तिची व आरोपीची ओळख झाली होती. एकमेकांच्या मोबाईवर त्यांचे चॅटिंगही सुरू होते. यातुनच ३ एप्रिल रोजी आरोपीने या युवतीला फुस लावून राजापुरात आपल्या मित्राच्या रूमवर नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील अधिक तपास करत आहेत




