
बाळ माने यांची निवडणुकीतून माघार
विधान परिषदेवर अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीची शक्यता
रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उबाठा गटाचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उमेदवार बाळ माने म्हणाले की, निवडणुकीचा घोडेबाजार आणि मतदारांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला यश मिळणे दूर वाटते. त्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनिल तटकरे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.



