वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ विशेष सायकल रॅली


रत्नागिरी, दि. 3 ) :- वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त दिनांक ७ जून रोजी जिल्हास्तरावर ‘संडे ऑन सायकल’ या विशेष सायकल रॅली व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू, क्रीडाप्रेमी, अधिकारी / कर्मचारी, खेळाडू, युवक-युवती, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. संडे ऑन सायकलिंग या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू/नागरिकांना https://fitindia.gov.in/world-bicycle-day वर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

इच्छुकांनी नियोजित वेळ व स्थळी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. वर्ल्ड बायसिकल डेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. या रॅलीचा सायकल रॅलीमार्ग : मारुती मंदिर सर्कल- हॉटेल सिल्वर स्वान- सायकल ट्रॅक रोड- नूतन नगर- अभ्युदय नगर- पॉवर हाऊस-मारुती मंदिर सर्कल असा असणार आहे.

देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी केंद्रशासन खेलो इंडिया योजनेच्या फीट इंडिया या मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. अशाच उपक्रमांपैकी जिल्हास्तरावर संडे ऑन सायकल या विशेष सायकल रॅली व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button