संगमेश्‍वर बाजारपेठेमधील किराणा व्यापारी पती-पत्नीच्या खात्यामधून २. १४ लाख रुपये लंपास


संगमेश्‍वर बाजारपेठेमधील एक किराणा व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तौफिक जिकर मेमन (३९, रा. नावडी, ता. संगमेश्वर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी सायंकाळी ६.२७ ते ७.१२ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेतील खात्यातून ८९ हजार १४९ रुपये, तर त्यांच्या पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या खात्यातून १ लाख २४ हजार ९९९ रुपये अशी एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे समोर आले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि. राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक खात्याची माहिती, पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button