
परकार हॉस्पिटलला बाळ माने यांची भेट; आगीच्या घटनेची घेतली माहिती
रत्नागिरी-शिवाजीनगर येथील परकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यश फाउंडेशनचे विश्वस्त तथा माजी आमदार बाळ माने यांनी परकार हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. अलीमिया परकार यांच्याशी चर्चा करून आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच रुग्णसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी विचारपूस केली.
आगीच्या घटनेमुळे हॉस्पिटलच्या काही विभागांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाळ माने यांनी हॉस्पिटल प्रशासनाला धीर देत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी यश फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




