
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक, हातखंब्यातील तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल.
लग्नाचे अमिष दाखवून महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित करुन तिची फसवणूक करणार्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मधुसूदन देसाई (रा. हातखंबा गुरववाडी, ता. जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. सन २०२२ ते २०२६ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
संशयित अमित याने पीडित महिलेच्या पतीसोबत ओळख निर्माण केली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेशी मैत्री वाढवली. त्यानंतर ’मी माझ्या पत्नीला सोडणार आहे, तू देखील तुझ्या पतीला सोडून दे, आपण एकत्र राहू आणि मी तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन त्याने पीडितेला देऊन तिचा विश्वास संपादन केला. तसेच २०२२ ते २०२६ या कालावधीत पीडितेशी शरीरसंबंध निर्माण केले असे पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अमित हा आपल्याला केवळ लग्नाचे अमिष दाखवून आपली फसवणूक करत असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. त्यानुसार तिने याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमित याच्याविरुद्धभारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com




