
जागतिक योग दिनानिमित्त राजापूर नगर वाचनालयात योग प्रशिक्षण वर्ग
राजापूर : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने राजापूर नगर वाचनालयाच्या वतीने उद्या (२० जून) सकाळी १०.३० वाजता योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथील ज्येष्ठ योगशिक्षिका रमा जोग यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास, योगाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी माहिती दिली जाणार आहे.
राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास वाचनालयाचे सर्व सभासद तसेच योगप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




