दुचाकी चोरांचा आता सरकारी कार्यालयाबाहेर वावर, रत्नागिरी शहरातील तहसीलदार कार्यालय परिसरातून दुचाकी लंपास


रत्नागिरी शहरातील तहसीलदार कार्यालय परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्योती प्रकाश कदम (५७, रा. तेलीआळी रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्योती यांनी त्यांची दुचाकी (एमएच ०८ एएच ३५९२) २५ मे रोजी तहसीलदार कार्यालय येथे उभी करुन ठेवली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने ही दुचाकी चोरून नेली अशी तक्रार ज्योती यांनी पोलिसांत केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button