दापोली-खेड मार्गावर अज्ञात वाहनाची धडक; महिलेचा जागीच मृत्यू


दापोली-खेड मार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे टाळसुरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिल्पा सुरेश साळवी (वय ४८, रा. आष्टाची वाडी, टाळसुरे) या दापोलीहून टाळसुरेकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दापोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button