अभ्यासात हुशार उत्कृष्ट बॅडमिंटनपटू अनुश्रीचा अपघाती मृत्यू

एसबीआयची कर्मचारी असलेल्या आईचाही मृत्यू

रत्नागिरी

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुवर्णा मरकड (वय 42) व अनुश्री मरकड (वय15 )या मायलेकींच्या जागीच मृत्यू झाला आहे तर वडील अनिल मरकड हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. तर इयत्ता दुसरीत असलेल्या चिन्मय हा अपघातात सुदैवाने सुखरूपरित्या बचावला आहे. या भीषण अपघातामुळे कुटुंब क्षणार्धात उध्वस्त झाल आहे. अपघातात मृत्यू झालेली अनुश्री ही पृष्ठ बॅडमिंटनपट्टी होती तिने यापूर्वी अनेक बॅडमिंटनच्या स्पर्धा गाजवल्या होत्या इतकेच नाहीतर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतही तीने अनेकदा नाव कमावलं होतं. अनुश्री ही अभ्यासातही हुशार होती इयत्ता नववी मध्ये तिने नुकतेच 95 टक्के पेक्षा अधिक मार्क मिळून ती क्लासमध्ये गुणवत्ता यादीत चमकली होती ती नुकतीच इयत्ता दहावी मध्ये गेली होती. दापोलीच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची ती विद्यार्थिनी होती. अनुश्रीला उत्कृष्ट डान्सही करता येत असे ते उत्कृष्ट डान्सरही होती. या भीषण अपघातात एम आय लेकिन चा मृत्यू झाला आहे. अनुश्री व तिच्या आई सुवर्णा यांच्या मृत्यू झाल्याची बातमी कळताच दापोली परिसरावर शोककळा पसरली असून अनुश्री हिच्या मृत्यूची बातमी कळताच मैत्रिणींकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात अनुश्रीची आई सुवर्णा मरकड यांचाही मृत्यू झाला आहे.त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी आहेत. त्या वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होत्या त्यापूर्वी दापोली शाखेत कार्यरत होत्या अलीकडेच त्यांची खेड तालुक्यातील फुरुस शाखेत बदली झाली होती. मनमिळावू स्वभावाच्या व मदतशील म्हणून त्या परिसरात परिचित होत्या.

या भीषण अपघातामुळे दापोली परिसरावर शोककळा पसरली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात दापोली येथे सहाय्यक कुलसचिव या पदावरती अनिल मरकड हे कार्यरत आहेत ते सुट्टी संपवून त्यांचे मूळ गाव असलेल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर पाथर्डी तिसगाव येथून ती पुन्हा दापोलीत येत होते त्यावेळी हा भीषण अपघात झाला. महामार्गावर पोलादपूर जवळ उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला मागून कारची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघाताचे वृत्त कळताच दापोली येथील कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी मरकड यांची दापोली येथील मित्रमंडळी पोलादपूर येथे दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button